आरती संग्रह

महालक्ष्मी

आरती -

आरती संग्रह
आरती -

महालक्ष्मीची आरती(मराठी)

महालक्ष्मीची आरती(मराठी)

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता |
प्रसन्न होऊनिया वर देई आता || धृ ||

विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता |
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता || १ |

विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही |
धावसी आम्हालागी पावसी लवलाही || २ ||

त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभो सुखशांती |
सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती || ३ ||

वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे |
देसी दान वरदे सदैव सौख्याचे || ४ ||

यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी |
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ||