आरती संग्रह

श्री कृष्णा

आरती -

आरती संग्रह
आरती -

श्री कृष्णाची आरती(मराठी)

श्री कृष्णाची आरती(मराठी)

ओवाळू आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ ||

चरणकमल ज्याचे अति सुकुमार |
ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ ||

नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान |
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू || २ ||

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी |
वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू || ३ ||

जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान |
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू || ४ ||

एका जनार्दनी देखियले रूप |
रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू || ५ ||